मुख्य मजकुराकडे जा
सुपीक क्रॉप सायन्स (Supik Crop Science) लोगो

आमच्याबद्दल

सुपीक क्रॉप सायन्सबद्दल

सुपीक क्रॉप सायन्स ही आधुनिक शेतीच्या गरजा लक्षात घेऊन शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी उत्पादने, आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत असलेली कंपनी आहे.

पीक पोषण, मातीचे आरोग्य, पीक संरक्षण आणि दर्जेदार बियाणे अशा शेतीच्या विविध गरजांसाठी प्रभावी कृषी उपाय उपलब्ध करून देत शेतकऱ्यांना अधिक सक्षम, प्रगतिशील आणि आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहित करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे.

गुणवत्तापूर्ण उत्पादने, योग्य मार्गदर्शन आणि नावीन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कार्यक्षमता वाढवणे, शेतीतील प्रगतीला चालना देणे आणि आधुनिक, आत्मनिर्भर व प्रगतिशील शेतकरी घडवण्यासाठी योगदान देणे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आधुनिक तंत्रज्ञान, सक्षम शेती, समृद्ध भविष्य!

स्थापना२०२५

आमचे ध्येय

“सुपीक माती, निरोगी पिके आणि समृद्ध शेतकरी.”

शेती समृद्धीचा नवा मंत्र, सुपीक तंत्र

सुपीक क्रॉप सायन्सचे संस्थापक अमोल दिलीपराव शिदोडकर यांचे छायाचित्र

संस्थापक

श्री. अमोल दिलीपराव शिदोडकर

संस्थापक / व्यवस्थापकीय संचालक

गेल्या २० वर्षांपासून शेतकऱ्यांसोबत काम करताना सेंद्रिय आणि शाश्वत शेतीतील विविध समस्या जवळून समजून घेण्याची संधी मिळाली. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी आणि त्यांना योग्य कृषी उपाय उपलब्ध करून देण्यासाठी सुपीक क्रॉप सायन्सची स्थापना केली.

गुणवत्तापूर्ण कृषी उत्पादने, योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांना आधुनिक, प्रगतिशील आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, हेच माझे ध्येय आहे. मातीचे आरोग्य, पीक संरक्षण, दर्जेदार बियाणे आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देत शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.

आम्ही कुठे आहोत

आमचा पत्ता खाली दिला आहे. शेतकरी आणि वितरकांनी निःसंकोच संपर्क साधावा.

प्लॉट नं. २२४, मु. पो. नांदोरा, ता. देवळी, जि. वर्धा, महाराष्ट्र – ४४२१०१

शेतकरी आणि वितरकांनो, आमच्याशी बोला.

उत्पादनांची माहिती आणि चौकशीसाठी कॉल करा किंवा व्हॉट्सॲपवर संदेश पाठवा.

कॉल करा व्हॉट्सॲप (नवीन टॅबमध्ये उघडेल)